स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई…
प्रतिनिधी/ रोहन कांबळे
कोल्हापूर: जिल्ह्यातील स्थानिक गून्हे अन्वेषण शाखेने राधानगरी तालुक्यातील तिटवे येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धडक कारवाई करत या छाप्यात ८लाख दोन हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक योगेश कुमार व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.बी धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.
तिटवे गावच्या हद्दीत अरविंद गुजरे यांच्या शेताजवळ उघड्यावर जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस अंमलदार संजय देसाई व राजू कोरे यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचत पोलीसांनी छापा टाकला.या कारवाईमध्ये रोख रक्कम ६७ हजार १८० रुपये,५ मोबाईल संच नऊ मोटरसायकली व इतर जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
या यशस्वी कामगिरीत पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्यासह संजय देसाई राजू कोरे, सागर चौगुले व अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश होत.











