नगरसेविका समिधा रेडकर यांच्या हस्ते झाले उद्घाटन…
वेंगुर्ले : दाजी नाईक
पक्षी, प्राणी, फुले, फळे या सह रंगबेरंगी दुनियेतून सहज आणि सुलभ माहिती अभ्यास स्वरूपात मिळेल अशी आकर्षक रंगरंगोटी करून चिमुकल्या मुलांना अभ्यासाची गोडी निर्माण करेल असे वेंगुर्ले शाळा नंबर ४ मधील अंगणवाडी वर्गखोलीचे रूप पालटले आहे. या नाविन्यपूर्ण वर्गखोलीचे उद्घाटन वेंगुर्ले नगरपरिषदेच्या नगरसेविका समिधा रेडकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
या वर्गखोलीसाठी लागणारी आर्थिक मदत हॉटेल कृष्णाचे मालक श्री. आनंद रेडकर आणि नगरसेविका समिधा रेडकर यांनी केली. त्यांच्या या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अंगणवाडी येथे सकाळी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला नगरसेविका समिधा रेडकर यांच्यासह माजी नगरसेविका प्रज्ञा परब, माजी नगरसेवक उमेश येरम, माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री हर्षद परब, ॲड. श्रद्धा परब – बाविसकर, रंगकार श्री. मठकर, मुख्याध्यापक श्री संतोष परब, अंगणवाडी सेविका नयना आरेकर व मदतनीस सत्यभामा गावडे. तसेच इतर अंगणवाडी सेविका स्मिता कोणेकर, राधा बागवे, सुनिता कांबळे, मदतनीस अवनी जाधव आणि पालकवर्ग कार्मेलीन डिसोझा, अन्वी जाधव, सुनंदा धारगळकर, सान्वी जाधव, धामनिया तांडेल आदी उपस्थित होते.
रंगकामामुळे अंगणवाडीची वर्गखोली बालकांसाठी अधिक आनंददायी व प्रेरणादायी बनली आहे. पालक, शिक्षक आणि समाजसेवक यांच्या सहकार्यामुळे बालकांचे शिक्षण व विकास अधिक सकारात्मक व सर्जनशील होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. या सोहळ्याद्वारे समाजातील उदारमतवाद, बालविकासासाठी केलेले योगदान आणि सामुदायिक एकजुटीचे उत्तम उदाहरण अधोरेखित झाले असे मत सर्वांनी आपल्या मनोगता मध्ये व्यक्त केले.











