गौरव पोंक्षे | माखजन
संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे येथील श्रीमती कमळजाबाई पांडुरंग मुळये हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज चे मुख्याध्यापक श्री रविंद्र मुळये यांचा सेवानिवृत्ती प्रसंगी सत्कार करण्यात आला.
प्रशालेतील सभागृहात झालेल्या शानदार कार्यक्रमात शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करणारे अनेक मान्यवर, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. रवींद्र मुळये यांनी ३१ वर्षे गणिताचे शिक्षक म्हणून सेवा वाहिली तर १ वर्ष मुख्याध्यापक म्हणून काम पाहिलं.
त्यांच्या सत्कार सोहळ्यावेळी संस्था अध्यक्ष नयन मुळये,सचिव दिलीप मुळये, शाळा समिती अध्यक्ष संदेश जोशी, माजी मुख्याध्यापक बी. डी. फराटके, पंचायत समिती सदस्य सुहास मायंगडे, बापू मुळये, नथुराम पाचकले, पोलीस पाटील सुनील शिगवण, विकास फेपडे, अमोल पाटणे, स्वप्नील मुळये, प्रथमेश मुळये आदिंसह पत्नी सौ स्नेहल मुळये, ओंकार मुळये, शिवानी मुळये, आकांक्षा मुळये आदी उपस्थित होते.
विद्यार्थी प्रिय असलेल्या रविंद्र मुळये यांच्या सेवानिवृत्ती प्रसंगी विद्यार्थ्यांचेही डोळे पाणावले. एकाच शाळेत ३२ वर्षे इतके प्रदीर्घ काम केल्यावर निवृत्त होत आहोत या भावनेने आपल्या मनोगतावेळी रविंद्र मुळये यांना अश्रू अनावर झाले.
त्यांना उपस्थितानी सेवानिवृत्ती नंतर च्या निरोगी दीर्घायुष्य चिंतत शुभेच्छा दिल्या.













