जागतिक महिला दिन निमित्त मालवण नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीच्या वतीने आयोजन
महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर यांची माहिती
मालवण | प्रतिनिधी : जागतिक महिला दिन मालवण नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीच्या वतीने मामा वरेरकर नाट्यगृह पटांगण येथे ८ मार्च रोजी विविध कार्यक्रमाने साजरा होणार आहे. नाचणी पासून बनवलेले पदार्थ पाककला स्पर्धा व खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी २.३० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत जागतिक महिला दिन कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. मालवण शहरातील मर्यादित महीला व मुलींकरिता पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. (नाचणी पासून बनवण्यात येणारे पदार्थ) प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या २५ महिलांना स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. विजेत्यांना आकर्षक बक्षीसे मालवण नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीच्या वतीने देण्यात येणार आहे.
तसेच मालवण शहर मर्यादित महीला व मुलींकरिता खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विजेत्यांना आकर्षक बक्षीसे मालवण नगरपरिषदच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने देण्यात येणार आहेत.
तरी पाक कला स्पर्धा नाव नोंदणीसाठी मोबाईल क्रमांक- ९५४५७२८८०२ श्री. खेमराज सावंत. यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.












