केरळा स्टोरी 2 या चित्रपटाला वैभवाडीतील मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून मोफत शो चे आयोजन

वैभववाडी प्रतिनिधी
कणकवली येथे केरळा स्टोरी 2 या चित्रपटाला वैभववाडीतील मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जवळपास 320 मुलींनी हा चित्रपट मोफत पाहिला. पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून हा चित्रपट दाखवण्यात आला. कणकवली येथील लक्ष्मी चित्रमंदिर या ठिकाणी या शो चे आयोजन करण्यात आले होते. मुलींमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वैभववाडी भाजपा महिला मोर्चा च्या वतीने चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती.