गौरव पोंक्षे | माखजन
चिपळूण शहरातील प्रभात रोड,मार्कंडी येथील तुलसी गृहनिर्माण सहकारी संस्थेमध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.विशेष म्हणजे सोसायटीतील पुरुष वर्गाने एकत्रित उपस्थित राहत,जागतिक महिला दिनाच्या महिलांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी जागतिक महिला दिनाचे महत्व अनेकांनी विषद केले,महिलां चे अधिकार,समान संधी,प्रत्येक क्षेत्रात पुढे येण्याच्या संधी आजवर देतच आलो आहोत.यापुढे ही असाच सन्मान प्रत्येक ठिकाणी राखला जाईल ,अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
यावेळी तुलसी संस्थेचे अध्यक्ष किशोर कदम,उपाध्यक्ष जयवंत आंब्रे,सचिव प्रवीण सावंत,खजिनादर दीपक खेडेकर,ॲड नार्वेकर,गजानन पेंडसे, गणेश खातू, महिला सदस्य सौ संध्या जोशी,तसेच
सौ शोभा कदम, सौ मृणाल सावंत,सौ मेघा पेंडसे,सौ मृण्मयी सोहोनी,सौ खडपे,सौ चव्हाण यांसह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
दरम्यान यावेळी पुरुष सदस्यांनी,महिलांना गुलाब पुष्प देत सन्मान केला.यावेळी महिलांनी देखील मनोगते व्यक्त केली. हा कार्यक्रम सोसायटीच्या कार्यालयात साजरा झाला.












