ओटवणे येथील गणपत गावकर यांचे निधन

ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे गावचे रहिवासी मुंबईस्थित ग्रामस्थ गणपत शंकर गावकर वय 66 यांचे हृदय विकाराच्या तीव्र धक्याने दुःखद निधन झाले.शिमगोत्सवासाठी गावी आलेल्या गणपत गावकर यांना काही दिवस अस्वस्थ वाटू लागले होते काल अचानक सावंतवाडी मधून घरी येताना जास्त त्रास जाणवल्याने त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले मात्र रात्री उशिरा त्यांची प्राण ज्योत विझली.ओटवणे येथील ग्रामस्थ मंडळ मुंबई चे ते कार्याध्यक्ष होते.गिरणी कामगार ते यशस्वी उद्योजक अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. ओटवणे गावातून मुंबईत गेल्या नंतर मिल मध्ये नोकरीला लागले मात्र मिल बंद पडल्यानंतर इतरांसारखं खचून न जाता स्वतः च्या पायावर उभ राहत रिक्षा व्यवसाय केला मात्र हे करत असताना आपल्या माणसांसाठी काही तरी करायचं आणि स्वतः आधी सक्षम व्हायचा हा ध्यास मनात धरला आणि कामगारांसाठीही लढा उभारला आणि इथूनच त्यांच्यातील नेतृत्व गुणाला वाव मिळाला त्यानंतर राजकारणात सक्रिय झाले काँग्रेस सारख्या मोठया पक्षाच्या माध्यमातून राजकारणात अनेक पदे भूषविली मुबई सारख्या शहरात एका खेडे गावातून गेलेल्या युवकाने आपल्या उमेदीच्या काळात मुंबईत वेगळा ठसा उमटवीला. सुशील सहकारी पतपेढीची स्थापना करत सर्व सामान्यासाठी, रिक्षा चालक, मजुर यांना कर्जाच्या सुविधा उभ्या केल्या. ताशंगा प्रतिष्ठान चे अध्यक्ष पद भूषविताना अनेक उपक्रम राबविले.बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर त्यांनी काँग्रेस पक्षाला राम राम ठोकत संभाजी ब्रिगेड चा झेंडा हाती घेत मुंबई मध्ये संघटना वाढीसाठी काम केल गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमदारकीही लढली होती.आपल्या संपूर्ण आयुष्यात अनेक पद आणि प्रतिष्ठा मिळविल्यानंतरही त्यांनी गावची कास कधीच सोडली नाही गावातील अनेक धार्मिक, सामाजिक कामासाठी ते गावी यायचे आपल्या गावी येत शेती मध्येही रामायचे.काही वर्षांपूर्वी त्यांनी काजू, फोफळी च्या बागाही फुलविल्या . त्यांची गावासाठी अजून काहीतरी करायचं स्वप्न, तळमळ मात्र अधुरी राहिली.त्यांच्या जाण्याने ओटवणे बरोबर मुंबई येथील त्यांच्या मित्र परिवाराकडून हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पच्छात पत्नी भाऊ, बहीण, भावजय पुतण्या पुतणी असा मोठा परिवार आहे.