मालवण | प्रतिनिधी : परमपूज्य हसरे महाराज (वय 70) हे शुक्रवार 13 मार्च रोजी सायंकाळी समाधिस्त झाले. त्यांचे मूळ गाव मुंबई माहीम असून त्यांचे पूर्ण नाव सुवर्ण भास्कर चिंचणकर असून ते हसरे महाराज या नावाने सर्वत्र परिचित होते. 14 मार्च रोजी सकाळी सुमारे 11 वाजता त्यांच्यावर अग्निसंस्कार भक्तगणाच्या उपस्थितीत राणे महाराज मठ कुसरवे येथे करण्यात येत आहेत. तरी भाविकांनी दर्शनासाठी राणे महाराज मठ येथे उपस्थित रहावे. अशी माहिती त्यांच्या भक्तगणाकडून देण्यात आली आहे.












