महाराष्ट्र नेव्हल युनिट NCC, रत्नागिरीची ‘B’ प्रमाणपत्र परीक्षा उत्साहात

रत्नागिरी :

महाराष्ट्र नेव्हल युनिट NCC, रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली NCC ‘B’ प्रमाणपत्र परीक्षा आज १५ मार्च २०२६ रोजी यशस्वीरित्या पार पडली. आर. पी. गोगटे कॉलेजच्या कॅम्पसमध्ये ही परीक्षा पार पडली असून विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

​ या परीक्षेसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतील एकूण १२५ NCC कॅडेट्स उपस्थित होते.

परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी कॅप्टन ऋषिकेश हाजे तसेच लेफ्टनंट कर्नल धनंजय देसाई यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले.

​त्याचबरोबर रत्नागिरी युनिटचे लेफ्टनंट कमांडर दिलीप सरदेसाई, मेजर सिमा कदम, सेकंड अधिकारी निशिता पिलणकर आणि एन.सी.सी. केअर अधिकारी निधी भाडवलकर यांच्यासह नौसेना अधिकारी व सिव्हिल स्टाफचे मोलाचे सहकार्य लाभले.

​कठोर परिश्रम आणि शिस्तीच्या जोरावर या कॅडेट्सनी आपले ‘बी’ सर्टिफिकेट मिळवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.