मसुरे | झुंजार पेडणेकर
देवगड तालुक्यातील मिठमुंबरी येथील स्वामी समर्थ मठ येथे २० मार्च रोजी स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २० रोजी सकाळी ७.३० वा. स्वामी चरणांवर अभिषेक, ९.३० वा. स्वामी भक्तांचा ‘श्री स्वामी समर्थ’ जप, १० वा. भजन, दुपारी १२ वा. स्वामींची महाआरती, १२.३० वा. महाप्रसाद, ३ वा. भजन, सायंकाळी ७ वा. महाआरती, ७.३० वा. भजन आदी कार्यक्रम होणार आहेत. लाभ घ्यावा असे आवाहन स्वामीभक्त आत्माराम नारायण गावकर यांनी केले आहे.













