विद्यार्थ्यांनी नोकरीच्या शोधात न राहता स्वतः उद्योजक बनावे -कुलगुरू डॉ. संजय भावे

दापोली | प्रतिनिधी : उद्यान विद्या महाविद्यालय दापोली येथे महाविद्यालयाचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी विद्यार्थ्यांनी उद्यान विद्या विषयाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या शोधात न राहता स्वतः उद्योजक होऊन इतरांना नोकरीची संधी उपलब्ध करून द्यावी अशी आवाहन कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून केले. कोकण प्रदेशातील हवामान विविध फळे भाजीपाला इत्यादीसाठी अनुकूल असल्याने या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने रोजगार निर्मितीस प्रचंड वाव असल्याचे नमूद केले यावेळी कार्यक्रमाला शिक्षण संचालक डॉ. प्रशांत बोडके विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत कुलसचिव डॉ. भरत साळवी, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत शहारे डॉ. चंद्रकांत पवार श्रीमती स्मिता पवार विद्यार्थी प्रतिनिधी विशाल केळकर आदी उपस्थित होते.महाविद्यालय मार्फत भरवण्यात आलेल्या उद्यानविद्या प्रदर्शनाचे उद्घाटन कुलगुरू व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.