मसुरे | झुंजार पेडणेकर :बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा येथे महिला दिन व सावित्री बाई फुले पुण्यतिथी विविध कार्यक्रमानी साजरी करण्यात आली.
मूग या कडधान्याचा वापर करून पाककला स्पर्धा घेण्यात आली.
परिसरातील महिलानी विविध पाककृती सादर केल्या.या स्पर्धेचे परीक्षण छाया पेणकर व प्रियांका भोगटे यानी केले.यावेळी स्पर्धक महिलाना प्रियांका भोगटे यांनी मार्गदर्शन केले. पाककृती तयार करताना घ्यावयाच्या दक्षता, डेकोरेशन करताना घ्यावयाची काळजी या विषयी सखोल मार्गदर्शन केले.
पेणकर यांनी सर्व महिलानी उत्कृष्ट पदार्थ तयार केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी महिलांसाठी वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये महिलानी
सावित्रीबाई फुले, गावकर गाऱ्हाणे, जिजाबाई, क्रिकेटर, योगा टिचर, सिंधुताई सपकाळ आदी वेशभूषा सादर केल्या.
या स्पर्धेचे परीक्षण रुतेशा झाट्ये व मधुरा माडये यानी केले.
महिलानी अशाच प्रकारे विविध कार्यक्रमात सहभागी घेऊन उन्नती साधावी असे आवाहन मधुरा माडये व झाटये यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मनोज काळसेकर यानी केले.
या दोन्ही स्पर्धेत २६ स्पर्धकानी भाग घेतला.
या कार्यक्रमास छाया पेणकर, बापू तळावडेकर, दीपक भोगटे, विद्या चिंदरकर, मनोज काळसेकर, विणा म्हाडगुत, प्रियांका भोगटे, मधुरा माडये, रुतेशा झाटये प्रियांका वाईरकर पोखरण कर मंगल तांबट, साक्षी अमरे,आदी उपस्थित होते.













