विजयदुर्ग (प्रतिनिधी) : विजयदुर्ग येथील रामनवमी उत्सवाला काल रविवारपासून प्रारंभ झाला असून नूतन मंदिरातील नवीन मुर्त्यांसह भव्य मिरवणूक काढण्यात आली. रामनवमी २६ तारखेला असल्याने पाच दिवस या उत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक कार्यक्रमांसोबतच देवगड येथील प्रसाद शेवडे तसेच मुंबई येथील महेश सारमंडळी यांच्या गायनाचा कार्यक्रम, दररोज महाप्रसाद आदी कार्यक्रमानी हा उत्सव संपन्न होत आहे. विजयदुर्ग पंचक्रोशीतील सर्व रामभक्तांनी या उत्सवाचा लाभ घ्यावा असा आवाहन आयोजकांनी केले आहे.











