शिरगाव (प्रतिनिधी) :
देवगड तालुक्यातील शिरगाव-रामनगर येथील श्री पावणदेवी बांदेश्वर मंडळाच्या वतीने गुरुवार, दिनांक २६ मार्च रोजी श्री राम नवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने शिरगाव-रामनगर येथील श्रीराम मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी १२.०० वाजता श्रीराम जन्म सोहळा, महाआरती व महाप्रसाद होणार आहे. त्यानंतर दुपारी ३.०० वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा व तीर्थप्रसाद, सायंकाळी ४.०० वाजता हरीपाठ, तसेच सायंकाळी ६.०० वाजता दिंडी भजन आयोजित करण्यात आले आहे.
सायंकाळी ७.०० वाजता ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम होणार असून, रात्री १०.३० वाजता गुरुकृपा दशावतार लोककला नाट्यमंडळ, कणकवली (हळवल) यांचा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
या उत्सवासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.













