कोकण रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! मुंबई-मडगाव दरम्यान धावणार ‘स्पेशल’ ट्रेन

वाचा सविस्तर वेळापत्रक

रत्नागिरी:
कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि मडगाव दरम्यान विशेष शुल्कासह ‘स्पेशल ट्रेन’ चालवण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला होणारी गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
गाडीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे:
१. गाडी क्र. ०११२९ मुंबई CSMT – मडगाव जंक्शन स्पेशल:
ही गाडी शुक्रवार, दि. ०३/०४/२०२६ आणि रविवार, दि. ०५/०४/२०२६ रोजी मुंबई CSMT येथून मध्यरात्री ००:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १५:१५ वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल.
२. गाडी क्र. ०११३० मडगाव जंक्शन – मुंबई CSMT स्पेशल:
ही गाडी शुक्रवार, दि. ०३/०४/२०२६ आणि रविवार, दि. ०५/०४/२०२६ रोजी मडगाव येथून संध्याकाळी १६:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:४५ वाजता मुंबई CSMT ला पोहोचेल.
महत्त्वाचे थांबे:
ही विशेष गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी या स्थानकांवर थांबेल.
गाडीची रचना:
या ट्रेनला एकूण २२ डबे असतील. यामध्ये:
* २ टायर एसी: ०१ कोच
* ३ टायर एसी: ०५ कोच
* स्लीपर (शयनयान): १० कोच
* जनरल (सामान्य): ०४ कोच
* SLR: ०२ कोच
बुकिंग कधी सुरू होणार?
गाडी क्र. ०११३० (मडगाव – मुंबई) साठीचे बुकिंग २४ मार्च २०२६ पासून सर्व प्रवासी आरक्षण केंद्रे (PRS), इंटरनेट आणि IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवर सुरू होईल.
प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. अधिक माहितीसाठी प्रवासी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.