फोंडाघाट- खैराटवाडी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चषक बॉक्स क्रिकेट स्पर्धा २७/२८ मार्च रोजी !

भव्य नाईट अंडर आर्म स्पर्धेची तयारी शेवटच्या टप्प्यात 

फोंडाघाट: कुमार नाडकर्णी — छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ, खैराटवाडी यांच्या वतीने, छत्रपती शिवाजी महाराज चषक भव्य नाईट अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन, शुक्रवार तारीख २७ आणि शनिवार तारीख २८ मार्च २६ रोजी सायंकाळी ठीक सात वाजता आयोजित केली आहेत. स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.तरी संघांनी चंद्रकांत लांबोरे, विठ्ठल लाड, तन्मय बोडके, सुनील लांबोरे, यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन आयोजक खैराट- माळवाडी, खैराटवाडी, बोकलबाटले सावरकुट यंग ब्रिगेड यांच्या वतीने करण्यात आले आहे. तरी क्रिकेट प्रेमींनी उपस्थित राहून आनंद लुटावा. असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे……