मंडणगड | प्रतिनिधी : संभाजी भिडे यांच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ता. मंडणगड यांचे वतिने नगरसेवक तथा जिल्हा सरचिटणिस आदेश मर्चंडे यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदार मंडणगड व पोलीस निरिक्षक शैलजा सावंत यांचेकडे त्यांच्या निषेधाचे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत 1 ऑगस्ट 2023 निवेदन सादर करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष नागसेन तांबे, तालुक सरचिटणिस रामदास खैरे, उपाध्यक्ष किरण पवार, जिल्हा संघटक विजय खैरे, युवक अध्यक्ष संकेत तांबे, उपाध्यक्ष संकेश कासारे, तातुका चिटणिस जितेंद्र जाधव, युवक कोषाध्यक्ष गौरव मर्चंडे, प्रसिद्धि प्रमुख विधान पवार, विरेन्द्र जाधव, अतुल कासारे, योगेश कासारे, आकाश पवार,विनोद लोखंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.










