नवयुग उत्कर्ष युवक मंडळ, भांबेड (पेठदेव) येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी

 

लांजा (प्रतिनिधी ) तालुक्यातील सार्वजनिक गणेश उत्सव व सामाजिक क्षेत्रात ओळख असणारे नवयुग उत्कर्ष युवक मंडळ, भांबेड (पेठदेव) येथे भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी संस्थेचे चिटणीस ऋषिकेश बेर्डे यांनी लोकमान्य टिळक यांचे स्वातंत्र्य चळवळीतील कार्य, सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करण्याबाबत लोकमान्य टिळकांचे योगदान, वृत्तपत्रीय अग्रलेख आदी कार्य स्पष्ट केले. तद्नंतर युवाक्रांती पतपेढी चे अध्यक्ष दिगंबर भिंगार्डे यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी नवयुग उत्कर्ष युवक मंडळ, भांबेड (पेठदेव) चे अध्यक्ष भालचंद्र लाड, विनोद तावडे, अमोल रेडिज, रविंद्र लाखण, राजेंद्र गांधी, प्रकाश जोशी, अनीस वाघू , सदानंद वाडकर, टी. पी. मोरे, प्रशांत गुरव, नामदेव तावडे , ऋषिकेश बेर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.