खोटले येथील आरोग्य शिबिराचा 143 रुग्णांना लाभ!

मसुरे | झुंजार पेडणेकर : श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान खोटले येथील आयोजित आरोग्य शिबिराचा 143 रुग्णांनी लाभ घेतला. शासकीय वैधकीय महाविद्यालय वैध्यकीय अधिकारी डॉ. गिडीयोन बॉस्को, डॉ. सुनिधी सावंत, डॉ. अभिरामी राजेश, डॉ. माऊली रुद्रावर, डॉ. आकाश टंकसाळे, श्रीम. आर्या कदम यांनी रुग्णांची तपासणी केली. उदघाट्न अध्यक्ष गणेश घाडीगावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. रिद्धी परब, खोटले प्राथमिक आरोग्य केंद्र

परिचारिका सौ. मयेकर, खोटले आरोग्य केंद्र आशाताई सौ. अर्चना मोडक,हिवाळे प्रा आ. केंद्र च्या परिचारिका सौ. परब,

रक्त तपासणी टेक्नि. सौ. मेस्त्री.

मसदे आरोग्य केंद्रचे आरोग्य सेवक श्री. ओंकार परब, जिल्हा रुग्णालय येथील सौ. मेघा परब यानी

श्रद्धास्थान सेवेकरी प्रमुख श्री व सौ. निलेश हर्णे यांनी रुग्णांना मार्गदर्शन सेवा केली. सर्व वैधकीय कर्मचाऱ्यांचा सत्कार मठाधीपती गणेश घाडीगावकर यांनी केला.