जाणता राजा ग्रुप लांजाच्या वतीने शनिवारी ४ एप्रिल रोजी मिनी शूटिंग हॉलीबॉल स्पर्धा

लांजा (प्रतिनिधी): जाणता राजा ग्रुप लांजा च्या वतीने आयोजित आणि आमदार किरण सामंत पुरस्कृत भव्य मिनी शूटींग व्हॉलीबॉल स्पर्धा उद्या शनिवार दिनांक ४ एप्रिल रोजी लांजा येथे होणार आहेत.
‌. शूटिंग हॉलीबॉल क्रीडा बांधवांमध्ये एकता आणि क्रीडा प्रेम वृद्धिंगत व्हावे या उद्देशाने आयोजित केलेल्या या मिनी शूटिंग हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता आमदार किरण सामंत यांच्या हस्ते होणार आहे.‌ यावेळी लांजा नगराध्यक्षा सौ.सावली कुरूप, उपनगराध्यक्ष मिलिंद उर्फ बाबा लांजेकर, गटनेता योगेश कावतकर, लांजा तहसीलदार सौ प्रियंका ढोले, मुद्रांक जिल्हाधिकारी सांगली प्रमोद कदम, लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ही स्पर्धा गणेश मंगल कार्यालय, जावडे रोड सारस्वत वसाहत लांजा या ठिकाणी होणार असून स्पर्धेतील प्रथम क्रमांक १५, ५५५/-रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक ११,१११/-रुपये व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक ७७७७/- रुपये व आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांक ३३३३/-रुपये व आकर्षक चषक अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच ,बेस्ट डिगर रोख रुपये ५००/-रुपये व चषक,शूटर रोख रुपये ५००/- व चषक,नेटमन रोख रुपये ५००/- रुपये व आकर्षक चषक अशी वैयक्तिक बक्षीस दिली जाणार आहेत
स्पर्धेसाठी ५०० रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली असून सहभागी संघांना सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. वेळ संध्याकाळी ६ वाजता स्पर्धा सुरू करण्यात येईल. ७.३० नंतर येणाऱ्या संघांना स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. चिठ्ठ्या टाकून सामने खेळविण्यात येणार आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क मंगेश लांजेकर ९४२३२९६८३०, संजय चव्हाण ९०४९३९७०५१
मकरंद पंत लिंगायत गुरुजी ८००७४२८७३० यांच्याशी संपर्क साधावयाचा आहे