छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष श्यामसुंदर राय यांचा आरोप
वेंगुर्ले : प्रतिनिधी
पुर्नरचित हवामान आधारित फळपिक विमा योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हयातील देवगड, वेंगुर्ला, मालवण या तालुक्यातील मंडळाना मार्च महिन्यातील तापमानात वाढ होऊन सुदधा तापमानाचा ट्रीगल झालेला नसून यामध्ये ज्या तालुक्यामध्ये आंबा विमा धारक शेतकरी कमी तेथे तापमानाची नोंद सलग आंब्याकरीता ट्रीगल दिसून येत आहे. त्यामुळे विमा कंपनी व स्कायमेंट यांच्या कारभाराबाबत संशय वाटत असल्याचा आरोप छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष श्यामसुंदर राय यांनी प्रसिद्ध पत्रकार द्वारे केला आहे.
मार्च महिन्यामध्ये तापमानाचा पारा ३७ अंशावर गेलेला असून यामध्ये वैगुर्ला, मालवण, देवगड या तालुक्यातील जी स्वयंचलित हवामान यंत्र आहेत. त्या मंडळाना तापमान नोंद (झिरोवर) म्हणजेच शून्य दिसत आहेत. असे दिसून येते की आंबा विमा धारक या वरील तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असून व सिंधुदुर्ग जिल्हयातील आंबा झोन म्हणून मानले जाणारे तालुके तेथेच तापमानाची नोंद झालेली नाही. यावरून हेतूपुरस्कर व जाणून बुजून शेतक-यांचा गळा दाबण्याचे काम सुरु आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सलग दोन दिवस तापमानाच्या झालेल्या टिंगलची नोंद दिसून येते. परंतु तिस-या दिवशी तापमान वाढलेले असून सुदधा याची वाढलेली नोंद दिसून येत नाही. यामध्ये ही प्रचंड स्वरुपात बागायतदारांमधून संभ्रम निर्माण होत आहे.
काजू ची परिस्थिती लक्षात घेता जानेवारी मध्ये थंडीचा पारा ९ अंशावर जाऊन सुदधा काजू जिथे जास्त प्रमाणात आहे. तिथे काजू साठी कमी तापमानाची नोंद झालेली दिसून येते. काजू विमाधारक शेतक-यांन वर हा निव्वळ आणि निव्वळ अन्याय झालेला असून आता आंबा विमाधारक यांच्यावर सुदधा हाच प्रकार होण्याची दाट शक्यता असल्यामुळे स्वयंचलित हवामान यंत्र ही सुदधा सदोष नसल्याचे दिसून येते. यावर ही कारवाई करावी लागेल. असे संघटना व आंबा व काजू उत्पादक शेतक-यांचे म्हणणे आहे. जर एप्रिल महिन्यामध्ये तापमान नोंदीचा ट्रिंगल दिसून न आल्यास आम्ही संघटनेच्या माध्यमातून आक्रमक भुमिका घेणार असल्याचा इशाराही श्यामसुंदर राय यांनी दिला आहे.












