परुळे :
जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिणपीठ, नाणिजधाम (रत्नागिरी) चे अधिपती जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुकांचा दर्शन सोहळा गुरुवार, ९ एप्रिल २०२६ रोजी परुळे बाजारपेठ येथे आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी १० वाजता भव्य मिरवणुकीने सोहळ्याला सुरुवात होईल. मिरवणुकीनंतर पादुकांची मंडपात स्थापना करण्यात येईल. या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे सामाजिक बांधीलकीतून २५० गरजूंना प्रत्येकी ५ आंबा कलमांचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर पादुकांचे विधिवत पूजन आणि आरती होईल.
दुपारच्या सत्रात सौ. स्नेहल कुलकर्णी यांचे प्रवचन होणार असून, नवीन भाविकांसाठी ‘उपासक-दीक्षे’चेही आयोजन करण्यात आले आहे. दर्शनानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून, बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.













