श्रृंगारतळीतील बंद गॅसचे सेंटर सुरु करावे

माजी सरपंच संजय पवार यांची मागणी तहसिलदरांना निवेदन
गुहागर (प्रतिनिधी):
गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी असलेल्या शृंगारतळीत गेली काही वर्षे सुरु असलेले चंद्रभागा गॅस सर्व्हिसचे सेंटर अचानक बंद करण्यात आले आहे. त्यामुळे येथील ग्राहकांची मोठी गैरसोयी झाली असून हे सेंटर पुन्हा सुरु करावे, अशी मागणी माजी सरपंच संजय पवार यांनी तहसिलदारांकडे केली आहे.
शृंगारतळी हे तालुक्याचे मध्यवर्ती केंद्र आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या या भागात एचपी गँसचे असंख्य लाभार्थी ग्राहक आहेत. गुहागर येथील चंद्रभागा गँस सर्व्हिसचे सेंटर पालपेणे फाट्यावर सुमारे ८ वर्षे सुरु होते. माल, १५ दिवसांपूर्वी हे सेंटर बंद करण्यात आल्याने येथील ग्राहकांची मोठी गैरसोय झाली आहे. एखाद्या ग्राहकाला अचानक सिलिंडर लागल्यास त्याला गुहागर येथे जाऊन ते आणावे लागते. त्यामुळे मोठा आर्थिक भुर्दंड बसतो. तसेच वेळही जातो. त्यामुळे हे सेंटर सुरु करावे, अशी मागणी पवार यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने तहसिलदारांना द्यावे, असेही पवार यांनी सूचित केले आहे.