जिल्हा वैश्य समाज संघटनेची नूतन कार्यकारणी जाहीर

संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी विकास शेट्ये यांची निवड

लांजा (प्रतिनिधी) :रत्नागिरी जिल्हा वैश्य समाजाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी विकास मधुकर शेट्ये (मंडणगड) यांची निवड करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्हा वैश्य समाजाची बैठक आणि नूतन कार्यकारणी निवडणूक प्रक्रिया लांजा येथे उत्साहात आणि शांततेत पार पडली. यावेळी नवीन संचालक मंडळाची घोषणा करण्यात आली. सन २०२५ ते २०३१ या कालावधीसाठी ही नूतन कार्यकारणी निवडण्यात आली.‌
नूतन कार्यकारिण पुढील प्रमाणे- अध्यक्ष डॉ.विकास मधुकर शेट्ये, उपाध्यक्ष राजाराम एकनाथ उर्फ हेमंत शिरगावकर, सेक्रेटरी- श्रीनाथ श्रीकृष्ण खेडेकर, खजिनदार- नरेंद्र जयराम बेलवलकर, सहसचिव समीर सुरेश पाटणे, सहखजिनदार- नंदकुमार रामचंद्र थरवळ, युवक अध्यक्ष श्रीनाथ श्रीकृष्ण खेडेकर, महिला अध्यक्ष म्हणून सौ स्मिता संतोष लाड तर सदस्य म्हणून राजेश रमाकांत खेडेकर, प्रकाश द्वारकानाथ कोळवणकर, प्रकाश मुकुंद बेर्डे, यशवंत बाळकृष्ण पाडावे,
सदस्य, कौस्तुभ रवींद्र भिंगार्डे, सौ सुषमा उमेश देवळेकर, सौ प्रीतम प्रशांत देवळेकर, सौ दामिनी दयानंद भिंगार्डे, संजय शेरे, विलास विठोबा नारकर, सुधीर जागुष्टे, प्रवीण विकास शेट्ये, नितीन कुसुमाकर शेट्ये, परेश चिखले, रोहन चौधरी, राजेंद्र बेलवलकर, देवेंद्र वणजू.
तसेच सदस्य.तालुका अध्यक्ष म्हणून राजाराम लेंडे (मंडणगड), श्रीराम माजलेकर (दापोली), शैलेश गांगण (खेड ), शरदचंद्र उर्फ बापू गांधी (देवरुख), प्रशांत शिरगावकर (गुहागर), पंकज कोळवणकर (चिपळूण), हेमंत शेट्ये (लांजा), किशोर नारकर (पाचल).‌ निमंत्रित सल्लागार म्हणून माधव रामचंद्र शेट्ये (दापोली), श्रीकृष्ण जागुष्टे( देवरुख),
अनंत विठोबा कोलते (पाचल राजापूर ), प्रदीप कुमार बेंडखळे (लांजा), प्रभाकर कोळवणकर (लांजा).
ही निवडणूक प्रक्रिया संस्थेचे सचिव माधव शेट्ये यांनी पूर्ण केली.‌नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. नवीन संचालक मंडळाने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात वैश्य समाजाची संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
ही विशेष सर्वसाधारण सभा पार पाडण्यासाठी लांजा येथील संस्थेचे सभासद विजय खवळे, प्रदीपकुमार बेंडखळे, यशवंत पाडावे, प्रभाकर कोळवणकर, विकास शेट्ये यांनी विशेष परिश्रम घेतले.