रत्नागिरीत भरधाव कारची दुचाकीला धडक; चालक जखमी करून कारचालकाचा पोबारा

रत्नागिरी ः प्रतिनिधी
भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून धडक देत अपघात केल्यानंतर पळ काढल्याची घटना शनिवार 11 एप्रिल रोजी दुपारी 1.30 वा.सुमारास जुना माळनाका येथील कॉटनकिंग दुकानासमोर घडली.
या अपघातात रफिक लतिफ मुल्ला (42,रा.राजिवडा,रत्नागिरी) हा दुचाकी चालक जमखी झाला आहे. शनिवारी दुपारी रफिक मुल्ला आपल्या ताब्यातील दुचाकी घेउन जयस्तंभ ते मारुती मंदिर असा जात होता. तो जुना माळनाका येथील कॉटनकिंग दुकानासमोर आला असता पाठीमागून येणाऱ्या भरधाव स्विफ्ट कारने त्याच्या दुचाकिला धडक देत अपघात करुन पळ काढला. यात रफिक मुल्लाला किरकोळ दुखापत झाली असून त्याला उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.