रत्नागिरी : शहरातील पटवर्धन हायस्कूल मैदान येथे कन्झ्युमर्स शाॅपी प्रदर्शन सुरु आहे. या प्रदर्शनाचा आज अखेरचा दिवस आहे. या प्रदर्शनात विविध स्टाॅल मांडण्यात आले आहेत. यातील ईहा डिस्ट्रिबुटर्स स्टाॅलला रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे, कन्झ्युमर्स शाॅपी प्रदर्शनाच्या आयोजिका सौ. मीनल मोहाडीकर यांनी भेट दिली. यावेळी ईहा डिस्ट्रिबुटर्सचे प्रमुख जाई मोने, शेखर मोने, अंजली प्रभुदेसाई, ग्राहक उपस्थित होते. ग्राहकांनी स्टाॅलला भेट दिल्याबद्दल ईहा डिस्ट्रिबुटर्स यांच्यावतीने सर्वाना धन्यवाद देण्यात आले.













