वेंगुर्ले : येथील न्यू इंग्लिश स्कूल उभादांडाची विद्यार्थिनी कु. स्नेहा प्रकाश वेंगुर्लेकर हिने विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नुकतीच संपन्न झालेल्या कथानक स्पर्धेत यश मिळवले
आरोस येथे कै. विद्याधर श्रीपाद शिरसाट यांच्या अकराव्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ आरोस शिक्षण प्रसारक मंडळ आरोस, विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आरोस व पारिजात फ्रेंड सर्कल आरोस यांच्या संयुक्त विद्यमानाने हि जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन केले होते
स्नेहा वेंगुर्लेकर नववी इयत्तेत शिकणारी न्यू इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी असून तिने या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला
या कथाकन स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या कु.स्नेहा वेंगुर्लेकर हिला प्रा. वैभव खानोलकर, आणि प्रशालेचे लिपिक अजित केरकर यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल मुख्याध्यापक वाळवेकर सर, संस्थाध्यक्ष विरेंद्र कामत आडारकर, उपाध्यक्ष रमेश पिंगुळकर, सचिव रांगोळीकार रमेश नरसुले याचबरोबर इतर पदाधिकारी यांनीही यशस्वी विद्यार्थिनी कु.स्नेहा वेंगुर्लेकर आणि तिचे मार्गदर्शक प्रा. खानोलकर, व अजित केरकर यांचे विशेष अभिनंदन केले आहे. या जिल्ह्यास्तरीय कथाकथन स्पर्धेतील यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.












