रत्नागिरी : प्रतिनिधी
तालुक्यातील टिके-भातडेवाडी येथील तरुणाने आजारपणाला कंटाळून व दारुच्या नशेत राहत्या घरी गळफास घ्ोत आत्महत्या केली. ही घटना मंगळवार एप्रिल रोजी रात्री 9 ते बुधवार एप्रिल रोजी सकाळी 6.45 वा.कालावधीत घडली आहे.
मंगेश तुकाराम कांबळे (41, रा.टिके भातडेवाडी, रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मंगेश हा आजारी होता तसेच, त्याला दारुचेही व्यसन होते. या दोन्ही कारणांमुळे त्याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.











