वेंगुर्ला तालुका पोलिस पाटील संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदी रेडी येथील सिताराम राणे यांची निवड

वेंगुर्ले : प्रतिनिधी

वेंगुर्ला पोलिस ठाणे अंतर्गत
वेंगुर्ला तालुका गाव कामगार पोलिस पाटील संघटनेची बैठक श्री. मधुसूदन सुतार मेस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली उभादांडा ग्रामपंचायत सभागृहात पार पडली. यावेळी संघटनेची वेंगुर्ला तालुका कार्यकारणी निवडली असून रेडी सुकळभाट पोलिस पाटील श्री. सिताराम सगुण राणे यांची तालुका अध्यक्ष म्हणून गुप्त मतदानाने निवड करण्यात आली.

गाव कामगार पोलिस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य शाखा वेंगुर्ला तालुका याची बैठक पार पडली. एकूण वेंगुर्ला तालुक्यातील ३४ पोलिस पाटील या बैठकीला हजर होते. त्यातील २० जणांनी राणे यांना मतदान केले. जर्नादन पेडणेकर, दाभोली पोलिस पाटील यांना एकूण १४ मते मिळाली. तर उपाध्यक्ष म्हणून श्री. विजय शिवराम नार्वेकर उभादांडा पोलिस पाटील, सचिव सौ. चारुता चंद्र परब, तुळस पलतड पोलिस पाटील, खजिनदार निलेश सुरेश पोळजी आसोली भाग १ पोलिस पाटील आणि सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणीसाठी वेंगुर्ला तालुक्यातून श्री. सुशांत मोहन नाईक वेतोरा वरचीआड पोलिस पाटील, सौ.संजना संदिप होडावडेकर आडेली पोलिस पाटील, सल्लागार म्हणून मधुसूदन गजानन सुतार मेस्त्री, आरवली, बांध , सागरतीर्थ पोलिस पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच वेंगुर्ला तालुक्यात १३ सदस्यांची कमिटी करण्यात आली आहे.