▪️सेवांगण कट्टा येथे महात्मा जोतिबा फुले २०० वा जयंती सोहळा विविध उपक्रमानी संपन्न
मसुरे | झुंजार पेडणेकर :बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्या वतीने महात्मा जोतिबा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.
प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
सेवांगणचे विश्वस्त दीपक भोगटे यानी महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवन कार्याची ओळख करून दिली. सुमारे पावणे दोनशे वर्षापूर्वी महात्मा फुले यानी सावित्रीबाई
फुले यांच्या साथीने स्त्री शिक्षणाचा पाया घातला त्यामुळेच आज महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत विधवा विवाह,
बालसंगोपन केंद्र, केशवपनास विरोध
ही त्यांची महत्वाची कार्ये आजही
किती महत्वाची आहेत हे जाणवते.
बॅ नाथ पै सेवांगण नेहमीच महिलांसाठी अनेक उपक्रम राबवते.आज गरजू महिलांसाठी नवीन मोफत शिवण वर्गाचा शुभारंभ होत आहे ही महात्मा फुले याना आदरांजलीच आहे असे ते म्हणाले.
हा शिवणवर्ग साक्षी अमरे अत्यंत जबाबदारीने
व आपुलकीने सांभाळत आहेत त्याना
त्यानी धन्यवाद दिले.
सौ. विशाखा स्वप्नील आपटे, श्रीम. रसिका राजेंद्र गावडे, सौ सानिका संदीप सावंत या शिवणवर्गाच्या विद्यार्थिनीनी आपली मनोगते व्यक्त केली. शिवणविभागाच्या संचालिका साक्षी अमरे यानी अत्यंत मायेने अभ्यासूपणे आम्हाला शिकवले त्यांचे ऋण कायमच राहिल.सेवांगणच्या प्रत्येक कार्यक्रमात आम्ही सहभागी होऊ
असेही त्या म्हणाल्या.
शिवण विभागाच्या संचालिका साक्षी अमरे यानी शिवण क्लासची माहिती दिली. मला आयुष्यात शिक्षिका व्हायचे होते. ती संधी सेवांगणने दिली त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत.
डिर्जाटल बोर्डचा वापर करून पुढील
शिवणवर्ग आणखी प्रभावीपणे
सुरू राहील असे त्या म्हणाल्या.
या वेळी महिला दिनानिमित्त आयोजित पाककला व वेशभूषा स्पर्धेतील महिलाना प्रशस्ती पत्र भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
शिवणकला पूर्ण केलेल्या महिलाना
प्रशस्तीपत्र व भेटवस्त देऊन सन्मान करण्यात आला.शिवणलासच्या मुलानी सेवांगणास
सिलिंग फॅन भेट दिला.
या कार्यक्रमास
किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, शोभा म्हाडगुत, दीपक भोगटे, मनोज काळसेकर, मंगल पराडकर, साक्षी अमरे,बाळकृष्ण गोंधळी शिवण विभागाच्या सर्व महिला उपस्थित होत्या.












