खासदार नारायणराव राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते शिबिराचे आयोजन
११० लाभार्थी व विद्यार्थ्यांनी घेतला लाभ
कणकवली : माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त जि.प. सदस्य मनोज रावराणे यांच्या सौजन्याने व भारतीय जनता पार्टी हरकुळ खुर्द यांच्या वतीने ग्रामपंचायत हरकुळखुर्द व महसूल प्रशासन कणकवली यांच्या सहकार्याने ग्रा.पं. हरकुळखुर्द येथे एकाच छताखाली संजय गांधी योजना लाभार्थी व विद्यार्थ्यांसाठी विनामोबदला उत्पन्न दाखले काढण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन १० एप्रिल रोजी जि.प. सदस्य मनोज रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले होते. शिबिरात ११० संजय गांधी योजना लाभार्थी व विद्यार्थ्यांनी उत्पन्न दाखल्यांसाठी अर्ज सादर केले होते.
या दाखल्यांचे वाटप २४ एप्रिल रोजी ग्रा.पं. हरकुळखुर्दच्या सभागृहात माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सांवत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच राजन रासम, उपसरपंच सर्वेश दळवी, माजी सरपंच महेश डिचवलकर, माजी उपसरपंच संजय रावले, शक्ती केंद्र प्रमुख राजेंद्र डिचवलकर, महेश दळवी, अविनाश रासम आदी उपस्थित होते.
संजय गांधी शाखा कणकवलीचे सिंगनाथ, फोंडाघाट सर्कल श्री. मुंडे, हरकुळखुर्द ग्राम महसूल सहाय्यक श्रेया शिंदे व सेतू सुविधा केंद्र यांच्या सहकार्याने दाखले तयार करण्यात आले. कार्यक्रमासाठी आर्थिक सहाय्य मनोज रावराणे यांनी केले. संपूर्ण उपक्रमाचे नियोजन माजी उपसरपंच संजय रावले यांनी केले, तर सूत्रसंचालन ग्रा.पं. हरकुळखुर्दचे लिपिक दशरथ डोंगरे यांनी केले.












