आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मालवण पंचायत समितीची 28 एप्रिल रोजी आमसभा

मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे आयोजन : सभापती प्रज्ञा चव्हाण व गटविकास अधिकारी शाम चव्हाण यांची माहिती 

 

मालवण | प्रतिनिधी : मालवण पंचायत समितीची सन २०२६-२७ या वर्षाकरिता विकासकामांबाबत नियोजन व राबवायच्या योजनेसंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी व सन २०२५-२६ या वित्तीय वर्षात झालेल्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी पंचायत समिती मालवणची आमसभा आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली २८ एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण व आमसभा सचिव गटविकास अधिकारी शाम चव्हाण यांनी दिली.

 

आमसभा आयोजित केल्याबद्दल सभापतींनी आमदार राणे यांचे आभार मानले आहेत. या आमसभेला लोकप्रतिनिधी, अधिकारी व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे. असे आवाहन सभापती सौ. प्रज्ञा चव्हाण, गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी केले आहे.

 

यावेळी उपसभापती घनश्याम झाड, पंचायत समिती सदस्य दीपक सुर्वे, दीपक चव्हाण, छोटू ठाकूर, संतोष गावडे, गणेश तोंडवळकर, मानसी भोगावकर, सीमा परुळेकर, रिया बावकर, माधुरी मसुरकर, योजना कांबळी आदी उपस्थित होते.