मंडणगड प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ प्रतिभा पाटील नियत वयोमानामुळे निवृत्त झाल्याने संस्थेने नियुक्त केलेले नवनिर्वाचित प्राचार्य अर्जुन हुल्लोळी यांनी आज प्राचार्यपदाचा कार्यभार स्वीकारला. यानिमित्त मंडणगड तालुका विकास मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष दिलीप जगताप, चिटणीस अभिजीत गांधी, संतोष मांढरे, संचालक राकेश शिंदे आणि शाळेचे पर्यवेक्षक शांताराम बैकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. तसेच त्यांना पुढील शैक्षणिक व प्रशासकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करत अर्जुन हुल्लोळी यांनी आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या बळावर प्राचार्यपदापर्यंत मजल मारली आहे. इंग्रजी विषयाचे शिक्षक म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर उपप्राचार्य आणि आता प्राचार्य असा त्यांचा प्रेरणादायी प्रवास राहिला आहे.त्यांच्या या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आणि शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला शिक्षक प्रतिनिधी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेचे शिक्षक नरेश माटवणकर यांनी केले. शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Home महत्वाच्या बातम्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यावयाच्या प्राचार्य पदी अर्जुन हुल्लोळी













