देऊळवाडा आरोग्यकेंद्रास स्कॅनर प्रिंटर भेट!

मसुरे | झुंजार पेडणेकर
माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान अंतर्गत मसुरे देऊळवाडा येथील श्री राजाराम पुंडलिक हडकर यांची कन्या सौ सुविधा राजाराम हडकर यांचे कडुन आयुष्यमान आरोग्य मंदिर देऊळवाडा करीता स्कॅनर प्रिंटर भेट देण्यात आला.प्राथमिक आरोग्य सेवा प्रत्येक व्यक्तीपर्यंत वेळेत आणि गुणवत्तेसह पोहोचवणे यासाठी राज्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत दिनांक 1 एप्रिल 2026 पासून ‘ माझे गाव आरोग्य संपन्न गाव ॔ हे अभियान सुरू करण्यात आले आहे. यावेळी आयुष्यमान आरोग्य मंदिराचे समुदाय अधिकारी डॉ. वीणा मेहेंदळे , सिस्टर श्रीम दिव्या पांजरी, आशा स्वयंसेविका श्रीम अंकिता मेस्त्री, श्रीम सुप्रिया नाचणकर,श्रीम प्रज्ञा फणसे अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. डॉ. वीणा मेहेंदळे यानी आभार मानले.