स्पेशल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत मैत्री इलेव्हन अजिंक्य
▪️जय हनुमान मित्र मंडळ विरण बाजारपेठचे आयोजन मसुरे | झुंजार पेडणेकर मालवण तालुक्यातील जय हनुमान मित्र मंडळ विरण बाजार पेठ आयोजित स्पेशल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत मैत्री इलेव्हन क्रिकेट संघाने रंगकर्मी मुकेश इलेव्हन संघावर मात करत अजिंक्यपद पटकावले. यंगस्टार इलेव्हन या संघाला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेचे उदघाट्न माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पं.स.मालवण सभापती सौ प्रज्ञा भाऊ चव्हाण, माजी सरपंच दत्ताराम उर्फ आपु आंबेरकर, उद्योजक सुरेश नेरुरकर, जेष्ठ कार्यकर्ते विलास पांजरी, कमलेश प्रभु, प्र.सरपंच शमिका वाडकर,उपतालुकाप्रमुख भाऊ चव्हाण,बाबु वाडकर, तालुका संपर्क प्रमुख पंकज वर्दम, पो.पा.निनाद माडये, माजी सैनिक जगदीश आंबेरकर, चेतन पांजरी पंडित पांजरी आदिसह क्रीकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री माजी सरपंच श्री आपु आंबेरकर श्री विलास पांजरी श्री सतिश वाळके श्री मुकेश नार्वेकर यांच्या संकल्पनेतून बाजार पेठ मित्र मंडळ च्या सहकार्याने आणि हनुमान क्रीडा मंडळ यांच्या मोलाच्या साथीतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शिस्तबद्ध संघ सागर इलेव्हन विरण, मालिकावीर नवनाथ वडर पोईप, उत्कृष्ठ फलंदाज प्रितेश पाटकर, उत्कृष्ट गोलंदाज वेदांत पवार -मसदे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शुभम परब-चुनवरे यांना पारितोषिक आणि चषक देण्यात आले.
प्रथम विजेत्या संघाला रुपये १५०००/कै. लक्ष्मी राजाराम आंबेरकर यांच्या स्मरणार्थ माजी सैनिक जगदीश आंबेरकर पुरस्कृत,व आकर्षक चषक पंकज वर्दम पुरस्कृत , द्वितीय पारितोषिक सभापती सौ प्रज्ञा भाऊ चव्हाण पुरस्कृत रुपये १००००/, आकर्षक चषक पंकज वर्दम पुरस्कृत,तृतीय क्रमांक चषक व शिस्त बद्ध संघ चषक अमोल हिर्लेकर पुरस्कृत, मालीकाविर सायकल भाऊ कांदळकर पुरस्कृत, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक सर्व चषक विवेक बेलवलकर
पुरस्कृत होते. प्रत्येक षटकारास रुपये १००/मुकेश नार्वेकर, सर्व मॅन ऑफ द मॅच मनिष परब पुरस्कृत होते. यष्टीरक्षक क्षेत्ररक्षक स्पोर्ट्स शुज नटराज फुटवेअरचे मालक पांडुरंग पाटकर यांज कडुन पुरस्कृत होते. स्पर्धेतील सर्व खेळाडूंना भोजन व्यवस्था श्री विलास पांजरी पुरस्कृत, स्टेज व्यवस्था माजी सरपंच आपू आंबेकर,थंड पाणी व्यवस्था शिवराम वाडकर,मैदान व्यवस्था वाडकर बंधू, स्पर्धेसाठी लागणारे चेंडू अरुण घाडीगांवकर बेलाची वाडी यानी पुरस्कृत केले. बक्षीस वितरण समारंभ माजी सैनिक श्री जगदिश आंबेरकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख भाऊ चव्हाण, माजी सरपंच श्री आपु आंबेरकर, श्री विलास पांजरी, सरपंच सौ शमिका वाडकर, श्री मनिष परब, श्री मुकेश नार्वेकर, श्री बाबु वाडकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख श्री जितेन्द्र परब, श्री मोहन पांजरी, सौ वृषाली विलास पांजरी, हनुमान क्रीडा मंडळ विरण चे सर्व खेळाडू, ग्रामस्थ आणि सहभागी सर्व खेळाडू उपस्थित होते.
पंच म्हणून ऍम्बरोज अल्मेडा व दीपक धुरी (मालवण ). समालोचन शाम वाक्कर, संदीप राणे, यश पांजरी, पंडित पांजरी. गुणलेखन आर्यन वाक्कर, यश पांजरी, जयवंत पांजरी तर सूत्रसंचलन संदीप राणे आणि आभार शाम वाक्कर यानी मानले.












