प्रमोद जठारांच्या माध्यमातून कोकण शतप्रतिशत भाजपमय होणार – भगवतसिंह चुंडावत

विधान परिषदेच्या उमेदवारी तून तळागाळातील भाजपा कार्यकर्त्यांमधून जल्लोषाचे वातावरण

देवरुख वार्ताहर / प्रतिनिधी:-
12 मे रोजी होत असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेच्या दहा जागांच्या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने कोकणातून कणकवलीचे माजी आमदार श्री.प्रमोद शांताराम जठार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने कोकणातील सर्वसामान्य भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारून उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.
भाजपा युवा नेता तथा भाजप महाराष्ट्र व्यापारी आघाडीचे प्रदेश खजिनदार श्री.भगवतसिंह प्रेमसिंह चुंडावत यांनी प्रतिक्रिया देताना हा कोकणातील सर्वसामान्य, तळागाळातील भाजपा कार्यकर्त्यांचा विजय असल्याचे विशेष नमूद केले आहे.
गेल्या अनेक वर्षांची भाजपा मतदार, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची विधान परिषदेची मागणी श्री.प्रमोद जठार यांच्या माध्यमातून पक्षश्रेष्ठींनी पुरी केली, हा खरोखरच दसरा – दिवाळी योग आहे.
गेली अनेक वर्ष कोकणात भाजपचा हुकमी मतदार असून त्यांना न्याय देण्यासाठी आवश्यक असलेले लोकप्रतिनिधी नव्हते.
केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असून देखील कोकणात म्हणावा तेवढा भाजपा कार्यकर्त्यांना न्याय मिळाला नाही.
ही पोकळी श्री.जठार यांच्या माध्यमातून निश्चितच भरून निघेल.
सर्वसामान्य नागरिकांमध्ये तसेच कार्यकर्त्यांमध्ये मिळून मिसळून काम करण्याची लखब, हातोटी हे जठारांकडे आहे. प्रमोद जठार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले एकनिष्ठ भाजप नेते आहेत. बारा वर्षांच्या प्रदीर्घ विलंबानंतर देखील त्यांनी पक्षकार्यात कुठेही कमतरता आणू दिली नाही. सदैव कोकणवासीयांच्या प्रश्नांसाठी त्यांनी आवाज उठविला.
आगामी काळात श्री.प्रमोद जठार हे निश्चितच कोकणात भाजपा शतप्रतिशत करण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी निश्चितच करणार, असा विश्वास भाजपा कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.