जय महाराष्ट्र मित्र मंडळाची नवीन कार्यकारणी जाहिर

अध्यक्षपदी विनय गुरव, उपाध्यक्षपदी प्रदीप गुरव व जितेंद्र गुरव तर सचिव पदी विजय गुरव 
 १५ सदस्यांची कार्यकारिणी जाहीर
राजापूर (प्रतिनिधी) : शहरातील गुरववाडी येथील जय महाराष्ट्र मित्र मंडळ, गुरववाडी मंडळाच्या नवीन कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष विनय गुरव यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत विविध पदांवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी पुन्हा एकदा राजापूरचे उपनगराध्यक्ष विनय गुरव, उपाध्यक्षपदी प्रदीप गुरव, जितेंद्र गुरव, तर सचिवपदी माजी नगरसेवक विजय बापू गुरव आणि सहसचिव पदी रोहन गुरव यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच कार्यकारिणी अध्यक्षांसह एकूण १५ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये सदस्य म्हणून सदस्य शशिधर बापू गुरव,विलास रामचंद्र गुरव, दत्ताराम शंकर गुरव, दत्ताराम भिकाजी गुरव, सुधाकर संभु गुरव, सुरेश बापू गुरव, आनंद महादेव गुरव, संजय शांताराम गुरव, भूपेंद्र पांडुरंग गुरव यांची निवड करण्यात आली आहे.
मंडळाच्या सामाजिक उपक्रमांमध्ये मंडळाचे अध्यक्ष विनय गुरव यांच्या योगदानाबद्दल उपस्थितांनी कौतुक करत ते राजापूरच्या उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
बैठकीत आगामी नवरात्रोत्सवाच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी गणेशोत्सव विसर्जन कालावधीत गुलालबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाचे उपस्थितांनी स्वागत केले. आगामी काळातील विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे नियोजनही यावेळी करण्यात आले.
बैठकीत मंडळाच्या विशेष योगदानाबद्दल दत्ताराम गुरव व सुरेश गुरव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये  राहुल गुरव, प्रशांत गुरव, रविंद्र गुरव, गुरव, शशिधर गुरव, संतोष गुरव, प्रवेश गुरव, भूपेंद्र गुरव, विराज कदम, विराज गुरव, पराग गुरव, विलास गुरव, मिलिंद गुरव, मधुकर गुरव, शांताराम गुरव, मंगेश गुरव, दत्ताराम गुरव, परेश गुरव, अर्जुन गुरव, जितेंद्र गुरव, यशिकांत गुरव, दीपक गुरव, रोहित गुरव आदींचा समावेश होता.