मसुरे | झुंजार पेडणेकर
श्री श्री १०८ महंत मठाधीश प.पू.सदगुरु श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पेनेतून साकार झालेल्या श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे १ मे रोजी वैशाख पौर्णिमा निमित्त श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे.
सकाळी ७ :०० वा. श्री स्वामी समर्थ महाराज मूर्ति आणि स्वामी पादुकांवर जलाभिषेक आणि दुग्धाअभिषेक आणि पूजन, सकाळी ९ : ०० वा. श्री सत्यनारायण महापूजा, सकाळी ११ वा. नैवेद्य आणि आरती,दुपारी १ :०० वा. महाप्रसाद-अन्नदान,
सायंकाळी ७ :०० वा. दैनंदिन आरती,
सायंकाळी ७ :३० वा. श्री देवी भराडी प्रासादिक भजन मंडळ – मसदे ( दिंडी पथक.) उपस्थितीचे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट यानी केले आहे.











