सालाबादप्रमाणे याही वर्षी १ मे रोजी कामगारदिनाचे औचित्य साधत सिंधुदुर्ग जिल्हा औषध कर्मचारी संघटनेमार्फत सामाजिक कार्याचे दर्शन झाले.
सिंधुदुर्ग औषध कर्मचारी संघटना गेली अनेक वर्ष विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे.या वर्षी मालवण येथे स्वच्छता अभियान राबवून शहराला स्वच्छ आणि पर्यटनदृष्ट्या पुढे जाण्यासाठी हातभार लावला.मालवण फिश मार्केट ते राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंतचा समुद्र किनारा स्वच्छ करत एवढ्या कडक उन्हात घाम गाळून शहराच सौंदर्य वाढविण्यास मदत केली.
तसेच जिल्हा संघटनेने औषध कर्मचाऱ्यांना जिल्ह्यात काम करत असताना होणारा त्रास कमी व्हावा यासाठी जिल्हा संघटनेने पुढाकार घेऊन कर्मचाऱ्यांना ओळखपत्र मालवण तालुका केमिस्ट असोसिएशन च्या सदस्यांकडून प्रदान करण्यात आली.
औषध कर्मचारी हा औषध व्यवसायातील महत्वाचा घटक आहे असे प्रतिपादन मालवण केमिस्ट तालुकाध्यक्ष श्री.सुपल यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
या वेळी व्यासपीठावर मालवण केमिस्ट असोसिएशन चे तालुकाध्यक्ष श्री.चंद्रशेखर सुपल ,नगरसेवक ज्येष्ठ औषध व्यापारी श्री.सुदेश आचरेकर,श्री.दत्तात्रय पारधीये,श्री.काशीनाथ तारी,श्री.ललित ढोलम,जिल्हा अध्यक्ष श्री.समीर ठाकूर,श्री.शेखर कुंभार,श्री.साईश अंधारी,श्री.अभिजीत गुरवश्री.जयराम राऊळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या दोन्ही कार्यक्रमांना जिल्ह्यातील बहुसंख्येने औषध कर्मचारी,जिल्हा पदाधिकारी,सर्व तालुकाध्यक्ष तसेच महिला औषध कर्मचारी उपस्थित होते.
हे दोन्ही कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यास मालवण केमिस्ट बांधवांचे मोलाचे
योगदान लाभले यासाठी त्यांचे कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष श्री.समीर ठाकूर यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर कुंभार आणि केलं तर आभार दीपक अनावकर यांनी मानले.












