गौरव पोंक्षे माखजन:
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल चा विद्यार्थी श्रीकृष्ण सचिन साठे यांने प्रज्ञाशोध परीक्षेत संगमेश्वर तालुक्यात द्वितीय क्रमांक पटवला आहे.
या स्पर्धेचे अयोजन
संगमेश्वर तालुका माध्यमिक अध्यापक संघाच्या वतीने करण्यात आले होते.श्रीकृष्ण हा प्रशालेतील प्रयोग शाळा सहाय्यक सचिन साठे यांचा मुलगा असून अतिशय हुशार आणि मेहनती आहे.विविध गोष्टींमध्ये दडलेल्या शास्त्राचा अभ्यास तो सतत करत असतो. विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींना विविध प्रश्न विचारून माहिती करून घेण्याचा त्याचा कल असतो.
श्रीकृष्ण च्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष मनोज शिंदे,सचिव श्रीकांत फाटक अन्य संचालक ,मुख्याध्यापक महादेव परब,पर्यवेक्षक अंबादास घाडगे आदिंसह शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.












