रत्नागिरी ः प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी पानवल येथे दुचाकी अपघातात गंभिर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारांदरम्यान सोमवार 4 मे रोजी जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्यू झाला. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जयसूर्या शांताराम मांडवकर (28,रा.कापडगाव,रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. 23 एप्रिल रोजी दुपारी 12 वा.सुमारास जयसूर्या मांडवकर हा आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-एवाय-2007) घेउन रत्नागिरीत ते हातखंबा रस्त्याने जात होता. तो पानवल येथील मुलष्टे यांच्या बागेसमोर आला असता त्याचा भरधाव दुचाकीवरील ताबा सूटला आणि दुचाकी रस्त्याच्या कडेला जाउन सिमेंट ब्लॉकवर आदळून हा अपघात झाला होता. या अपघातात जयसूर्याच्या डोक्याला गंभिर दुखापत झाल्यामुळे त्याच्यावर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतू उपचारांदरम्यान सोमवारी त्याचा मृत्यू झाला.











