रत्नागिरी :
शैक्षणिक व सामाजिक संस्था, सैतवडे ता.रत्नागिरी संचलित न्यू इंग्लिश स्कूल,सैतवडे शाळेच्या माजी विद्यार्थी संघाचा स्नेह मेळावा न्यू इंग्लिश स्कूल,सैतवडे प्रशालेत शनिवार दि. 02 मे 2026 रोजी सायंकाळी ठीक 04.00 वाजता आयोजित करण्यात आला होता.सुमारे 100 माजी विद्यार्थी या मेळाव्यासाठी उपस्थित झाले होते.कार्यक्रमाची प्रस्तावना व उपस्थितांचे शाब्दिक स्वागत झाल्यावर संस्था व शाळेसाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले परंतु जे आज हयात नाहीत अशा सर्व दिवंगत थोर पुरुषांना श्रद्धांजली,आदरांजली वाहण्यात आली.शालेय विद्यार्थिनीनी सादर केलेल्या ईशस्तवन व स्वागत गीताने मेळाव्याला प्रारंभ झाला. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री. साजिदभाई शेकासन यांनी सादर केलेल्या प्रास्ताविकात माजी विद्यार्थी संघाचे महत्व सांगताना शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या योगदानाची गरज असल्याचे नमुद केले. ओळख परेड करताना माजी विद्यार्थी कॅप्टन नईम भोंबल म्हणाले की आम्ही याच शाळेतून शिकून नावारूपाला आलो. तरी शाळेच्या भविष्यकालीन उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्याचे आवाहन केले.शाळेचे माजी विदयार्थी सुनिल उर्फ भाई जाधव यांनी कार्यक्रमाच्या आयोजनबद्दल धन्यवाद देताना विद्यार्थी दशेतले अनेकविध अनुभव शेअर करत शाळेच्या भरभराटीसाठी प्रतिवर्षी रोख स्वरूपातील निधी जमा करून शाळेत अनेक प्रकारचे उपक्रम राबवता येतील जेणेकरून दर्जेदार शिक्षणासाठी सैतवडे व परिसरातील गावांतील मुलांना बाहेर कुठेही जावे लागणार नाही असा ठाम विश्वास दिला.माजी विद्यार्थी व संस्था अध्यक्ष श्री. सज्जादभाई सय्यद यांनी संस्था व शाळा यांच्या कार्यक्रमणाबद्दल उद्धबोधित करताना, सर्वजण योग्य पद्धतीने साथ सहयोग देत असल्याबद्दल सर्वांचे ऋण व्यक्त केले.माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष श्री.उदय महाकाळ यांनी शाळा व माजी विद्यार्थी संघाने राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल धन्यवाद देताना विद्यार्थी दशेतील अनेक आठवणींना उजाळा दिला. आणि आपल्या पत्रकारितेतून शाळेच्या विविध उपक्रमांना प्रसिद्धी देण्याचे काम करण्याची संधी आपल्याला मिळत असल्याने समाधान व्यक्त केले. माजी विद्यार्थी संघाचे कोषाध्यक्ष श्री.दिपक भार्गव लिंगायत मेळाव्याच्या आयोजनाने भारावून जात शाळेसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यास आपण सदैव तयार असल्याचे नमूद केले.मुख्याध्यापिका श्रीम.सिद्धी लांजेकर यांनी मेळाव्याच्या आयोजनाबद्दल आनंद व्यक्त करताना शाळा राबवत असलेल्या उपक्रमांबद्दल माहिती दिली. शाळेचे माजी विद्यार्थी व रलागिरीतील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक रिजन्सीचे मालक श्री सलीम मुकादम यांनी मेळाव्याच्या आयोजनाबाबत समाधान व्यक्त करताना मिमिक्री सादर केल्या.श्री हनिफ पेटकर,श्री.जावेद ठाकूर, श्री.रईस मुल्ला, डॉ.मयुरेश मोहिते,श्री. मुज्जमिल मुल्ला,रिजवान शेकासन, वसिम खान, ओमकार शिर्के, फहिम भोंबल, श्री श्रीधर पवार, रुपेश पवार,उदय वझे, संदिप मेस्त्री,पत्रकार अनिकेत पवार तसेच शाळेच्या माजी विद्यार्थीनी सन्माननीय मुसरत काझी -कापडे मॅडम लेक्चरर मुंबई, नसिरा काझी-माद्रेमॅडम, रुखसार खान,तस्बीहा पेटकर,भाग्यश्री पवार मॅडम, स्मिता मोहिते, सोनल मोहिते, सायली मोहिते, श्रुणाली मोहिते,नाजनिन सय्यद – खलपे, तसनीम सय्यद – मुकादम, सलोनी पवार, तनुजा सागवेकर, चंदना साईलकर, छाया सावंत यांनी शुभेच्छा दिल्या व शाळा राबवित असलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल एक समाधान व्यक्त केले. यावेळी शैक्षणिक व सामाजिक संस्था सैतवडेचे उपाध्यक श्री.अ.अजिज इस्माईल मुकादम साहेब,सचिव श्री. समीर अ. रज्जाक सय्यद,खजिनदार वहाबभाई खलपे, सदस्य- श्री.लियाकत शेकासन,श्री जावेद काझी,मुजफ्फर सय्यद, शाळेचा संपूर्ण स्टाफ-सौ.शेकासन मॅडम, गंधेरे सर, चव्हाण सर, संज्योत खेडेकर मॅडम,लिपिक शोझब चिकटे, उपस्थित होता.कार्यक्रम यशस्वी करणेसाठी शाळेचे सर्व आजी माजी विदयार्थी, रविंद्र लवंदे, फैयाज भाटकर,स्वयंपाकी सुवर्णा बैकर सौ.सय्यद यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी अध्यक्ष
श्री.साजिदभाई शेकासन
यांनी उपस्थितांचे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल आभार व्यक्त केले. समुह भोजनानंतर कार्यकमाची सांगता झाली. प्रशालेचे माजी मुख्याध्यापक श्री.एम.जी. कुलकर्णी,श्री.विष्णू कुंभार सर, माजी क्रीडा शिक्षक श्री. संभाजी जाधवसर,नांदुरकर सर,डोकेसर संस्था सदस्य इम्रान चिकटे, समिउद्दीन माद्रे, अ.गणी दळवी,रफिक मुल्ला यांनी मेळाव्यास शुभेच्छा दिल्या.
Home महत्वाच्या बातम्या न्यू इंग्लिश स्कूल,सैतवडेच्या माजी विद्यार्थी संघाचा स्नेह मेळावा मोठया दिमाखात संपन्न













