आंबा व काजू उत्पादक शेतकरी यांनी नुकसानीचे पंचनामे तत्काळ सादर करावेत : १० मे ही शेवटची मुदत

वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुक्यातील जवळजवळ ७० टक्के आंबा उत्पादक व काजू उत्पादक शेतकरी यांनी अजून पंचनामे सादर केलेले नाहीत. आणि हे सादर करण्याची अंतिम मुदत १० मे ही शेवटची दिलेली आहे. त्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांनी आपले पंचनामे तालुका कृषी विभाग किंवा आपल्या गावातील कृषी सहाय्यक अधिकारी याच्याशी संपर्क करून पंचनामे सादर करावेत. फळ पिक विम्याचा या नुकसान भरपाई मध्ये कोणताही प्रश्न उद्भवत नाही. ही नुकसान भरपाई एनडीआरएब व एचडीआर नैसर्गिक आपत्तीची असून याचा फळ पिक विमा मध्ये कोणताही संबंध येणार नाही. हवामानाच्या बदलामुळे झालेल्या ट्रिगलच्या प्रमाणे जी आहे ती फळपीक नुकसान भरपाई मिळणार त्यामुळे आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांनी यामध्ये संभ्रमात राहू नये. तत्काळ पंचनामे करून घ्यावेत असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष शामसुंदर राय यांनी केले आहे. जेणेकरून या नुकसान भरपाई मध्ये कोणीही वंचित राहणार नाही.
बागायतदार शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई ही कमी असल्यामुळे याकडे त्यांचा दुर्लक्ष होत आहे. तसेच कृषी विभागाकडून हवी तशी प्रसिद्धी आणि शेतकरी व बागायतदार यांच्याकडे जाऊन काम होत नसल्यान ही परिस्थिती उद्भवली आहे. २२ हजार पाचशे यामध्ये खर्च निघणार नाही असेही आंबा काजू बागायतदारांकडून बोलले जात असल्यामुळे कदाचित यावर दुर्लक्ष होत आहे. तरीही बागायतदारांनी दुर्लक्ष करू नये व आपला पंचनामा दहा तारीखपूर्वी तालुका कृषी विभाग कृषी सहाय्यक अधिकारी यांच्याकडे सादर करावा आता पर्यंत ३० टक्के फक्त तालुका कृषी विभागाकडे पंचनामे सादर झालेले आहेत. त्यामुळे कुठचाही बागायतदार या नुकसानीपासून वंचित राहू नये म्हणून तालुक्याच्या आपापल्या कार्यक्षेत्रात कृषी सहाय्यक यांनी उर्वरित राहिलेल्या दिवसात तात्काळ प्रसिद्धी करावी आणि पंचनामे करून घ्यावेत, असे आवाहन राय यांनी केले आहे.