चिपळूण गुहागर तालुक्यात आ.ज्ञानेश्वर म्हात्रेंच्या फंडातून सोलार वाटप

गौरव पोंक्षे माखजन:
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि गुहागर या तालुक्यातील माध्यमिक शाळांना सोलर पॅनल चे वाटप आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून वाटप करण्यात आले.
कोकण विभागाचे शिक्षक आमदार माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम२०२५-२६ अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांना आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व माजी आमदार विनय नातू यांच्या प्रमुख उपस्थितीत सौ सुचित्रा निळकंठ ढेरे विद्यालय देवखेरकी चिपळूण येथे वाटप करण्यात आले. शाळांना मिळणारे वेतनेतर अनुदान हे अत्यंत तुटपुंज आहे, अनेक शाळांना लाईट बिल भरण्यासाठी सुद्धा पैसे नसतात, दुर्गम डोंगराळ भागामध्ये लाईट सुद्धा खंडित होत असते, या सर्वांचा विचार करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब सौर ऊर्जेला प्राधान्य देण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा हा प्रयत्न आहे, यातून शाळांना प्रेरणा आणि विद्यार्थी शालेय गुणवत्ता वाढवण्यासाठी सोलर सिस्टिम चा उपयोग करण्यात यावा याकरिता.चिपळूण तालुक्यातील २०आणि गुहागर तालुक्यातील १० शाळांना असे सुमारे ७५ लाखाचे सोलर सिस्टिम साहित्य वाटप करण्यात आले, सदर साहित्य फिटिंग करण्यासाठी पॅनल बॅटरी यूपीएस आणि वायरिंग फिटिंग साठी लवकरच लोक साहित्य घेऊन शाळेमध्ये येतील, सोलर पॅनल सिस्टीम बसवल्यानंतर, त्याची निगा आणि देखरेख विषय सुद्धा माहिती देण्यात आली. उर्वरित शाळांना दुसऱ्या टप्प्यात सोलर पॅनल देण्यात येतील, आज पर्यंत कोकण विभागात कोणकोणती काम केली त्याबद्दल माहिती दिली तसेच अनुदान, पेन्शन, अर्धवेळ शिक्षक, विध्यार्थी निकष, शाळा तेथे मुख्याध्यापक, TET, अशैक्षणिक कामे, वेतनेतर अनुदान व अन्य शैक्षणिक विषयांवर व करत असलेली कामे पाठपुराव्या बद्दल आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी मार्गदर्शन केले. तसेच मी आमदार झाल्यापासून रत्नागिरी जिल्हाकरिता आता पर्यंत जवळपास ५ कोटी ५० लाखाचे शैक्षणिक साहित्य देऊ शकलो याचा मला अभिमान आहे आणि अजून बरेच काही प्लॅन शिक्षक आणि विद्यार्थीहित करिता डोक्यात आहे त्याकरिता आपली साथ आणि सहकार्य असेच राहूद्या असे भावनिक आवाहन देखील केले
या प्रसंगी माजी आमदार भाजपा नेते मा. विनयजी नातू , जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे , जतिन घटे, महेश कांबळे, संजू वाघमारे, लतेश मामा नांदगावकर, विलास दादा म्हात्रे, राजेश जाधव, मंगेश गोरीवले, सरपंच नम्रता मोहिते मॅडम कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक अनंत साळवी सरांनी केले, लाभार्थी शाळांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.