मसुरे एज्युकेशन सोसायटीच्या शाळांचा १०० टक्के निकाल!

▪️बागवे हायस्कूल मधून चैतन्य भोगले तर भरतगड हाय. कु. श्रेया परब प्रथम 

मसुरे | झुंजार पेडणेकर 

मसुरे एज्युकेशन सोसायटी, मुंबई संचालित आर.पी. बागवे हायस्कूल, मसुरे आणि भरतगड हायस्कूल नं. २, मसुरे देऊळवाडा या दोन्ही प्रशालांनी मार्च २०२६ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. दोन्ही शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे.

आर.पी. बागवे हायस्कूलमधील गुणवंत विद्यार्थी:

प्रशालेतून कुमार चैतन्य भगवान भोगले याने ८९.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. कुमार सुरज संतोष मसुरकर (८५.८० टक्के) द्वितीय, तर कुमारी नेहा महादेव शिंगरे (८३.०० टक्के) हिने तृतीय क्रमांक मिळवला.

भरतगड हायस्कूल नं. २ मधील गुणवंत विद्यार्थी:

या प्रशालेतून कुमारी श्रेया उमेश परब हिने ७२.८० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. कुमारी वैष्णवी सुरेश चव्हाण (७७.४० टक्के) हिने द्वितीय, तर कुमारी श्रेया चंद्रशेखर सावंत (५०.८० टक्के) हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मसुरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण द. मुळीक-परब, सचिव श्री. प्रसाद मेघ:शाम बागवे, लोकल कमिटी अध्यक्ष श्री. राजन परब यांच्यासह सर्व कार्यकारिणी संचालक, शाळा समिती, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले आहे.