रत्नागिरी :
अभिनंदन! अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय येथे अकरावीच्या प्रवेश नोंदणीसाठी समुपदेशन केंद्राची निर्मिती करण्यात आली असून विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-१ विनामूल्य भरून देण्यासाठी सदर समुपदेशन केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.
दि. ११ मे २०२६ पासून महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीतील भौतिकशास्त्र विभागात सकाळी १०.०० ते दु. १.०० या वेळेत विनामूल्य सुविधा देण्यात येईल. दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतून शाळा सोडल्याचा दाखला व बोर्ड मार्कशीट उपलब्ध झाल्यावर दि. १८ मे २०२६ पासून प्रवेश अर्जाचा भाग- २ भरून देणे आणि Preference कॉलेज निवडण्यास मदत करणे अशी सुविधा विद्यार्थ्यांना या समुपदेशन केंद्रातर्फे उपलब्ध करून देण्यात येईल.
अधिक माहितीसाठी अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रवेश प्रक्रिया समन्वयक प्रा. मकरंद दामले मोबा. ९४२११४३३४३; पर्यवेक्षक प्रा. व्ही. टी. केळकर मोबा. ९४२११४३३०४; उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी गोसावी मोबा. ९३७०३८६९९१/ ७०५७३७४०७५ यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.
Home महत्वाच्या बातम्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी येथेअकरावीच्या प्रवेशासाठी विनामूल्य विद्यार्थी समुपदेशन केंद्र कार्यान्वित...












