अकरावी च्या प्रवेश प्रक्रियेबाबत ग्रामीण भागात विद्यार्थ्यांचे उदासीन धोरण

गौरव पोंक्षे माखजन:
ग्रामीण भाग असो वा शहरी १० वी चा निकाल लागला की ११ वी ला कोणत्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा याबाबत,या पूर्वी विद्यार्थ्याना उत्सुकता असायची.आणि विद्यार्थ्यांची लगबग पहायला मिळायची.गेल्यावर्षी च्या आधी निकाल हातात आला की विद्यार्थी प्रत्यक्ष कॉलेजला जाऊन प्रवेश घेत असत.गेल्यावर्षी पासून ऑनलाईन प्रवेशाला प्रारभ झाल्यापासून वर्षांगणिक विद्यार्थ्यांचा ऑनलाईन प्रवेश घेण्याबाबत ची उदासीनता दिसून येत आहे.
गतवर्षी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया झाली.यावर्षी याचं प्रक्रियेत थोडे बदल करून निकालापूर्वी कॉलेज निवड व नाव नोंदणी ठेवण्यात आली होती.परंतु ग्रामीण भागात कोट्याच्या पन्नास टक्के देखील नाव नोंदणी झाली नसल्याचे चित्र आहे.बहुतांश ठिकाणी तर कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना दहावी झालेल्या विद्यार्थ्यांना नाव नोंदणी करा,ऑनलाईन प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करा असे वारंवार सांगावे लागत आहे.
दहावी परीक्षा दिलेली बहुतांश विद्यार्थी परगावी असल्याचे चित्र आहे.दहावी च्या लेखी परिसखेपासून लगेचच लागलेला निकाल हा विद्यार्थ्यांना पचनी पडताना दिसत नसल्याचे चित्र आहे
ग्रामीण भागात ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करताना असंख्य अडचणी येत आहेत.विद्यार्थ्यांना भरावी लागणारी माहिती,इंटरनेट चा अभाव ह्या देखील गोष्टी प्रक्रिया सुलभ होण्यापासून रोखत आहेत.ग्रामीण भागातील विद्यार्थी ऑनलाईन प्रक्रियेकडे दुर्लक्ष करत असल्याने सध्या कॉलेज कोटा अर्धा देखील भरला नसल्याचे चित्र आहे.
अनेक विद्यार्थ्यांनी ही ऑनलाईन प्रक्रिया जाणूनच घेतली नसल्याने,प्रवेश प्रक्रिया यावर्षीही कुर्म गतीने होणार असल्याने चित्र आहे.शिक्षकांनी दहावी पास विद्यार्थ्यांशी संपर्क साधून,देखील विद्यार्थी या प्रक्रियेकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे.
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपल्या अपेक्षित असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात तात्काळ प्रवेश नोंदवून सहकार्य करावे असे आवाहन विविध क.महाविद्यालये व अधिकारी यांचे कडून करण्यात येत आहे