महिला सक्षमीकरणासाठी सिंधुदुर्गात ‘उमेद मॉल’ उभारणार; पालकमंत्री नितेश राणे यांची घोषणा

कुडाळमध्ये ‘नर्मदा आई’ मालवणी महोत्सवात पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली भेट

कुडाळ (प्रतिनिधी ) :
महिला सक्षमीकरण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उमेद मॉल उभा केला जाईल असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी कुडाळ येथे नर्मदा आई महिला सहकारी संस्थेच्या मालवणी महोत्सवाच्या कार्यक्रमात केले. नर्मदा आई महिला सहकारी संस्थेच्या वतीने कुडाळ येथे मालवणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवाला पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट दिली यावेळी महोत्सवात असलेल्या स्टॉलची पाहणी त्यांनी केली त्यांच्या सोबत संस्थेच्या अध्यक्षा सौ संध्या तेरसे, भाजपचे राजू राऊळ, श्रीपाद तवटे, सचिव मोरे उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी या मालवणी महोत्सवाचे कौतुक केले अशा महोत्सवामुळे येथे उत्पादित होणाऱ्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मदत होते हा उपक्रम स्तुत्य आहे अशा प्रकारे महिलांना सुद्धा रोजगार निर्माण व्हावे म्हणून उमेद मॉल सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभा करण्याचा आमचा मानस आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.