उपजिल्हा रुग्णालय येथील रक्तपेढीत अल्प प्रमाणात उपलब्ध असलेल्या रक्त साठ्यामुळे आणि सामाजिक बांधिलकी जोपासत सिंधुदुर्ग जिल्हा औषध कर्मचारी संघटना,सिंधुदुर्ग यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय,ओरोस येथे संघटनेमार्फत रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आव्हान करण्यात आले होते.सदर च्या शिबिरामध्ये २१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य केलं.रक्त संकलन पेढी,ओरोस यांच्याकडून औषध कर्मचारी संघटनेचे कौतुक होत असून त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा देण्यात आल्या. संघटनेच्या वतीने रक्त पेढी कर्मचारी आणि रक्तदात्यांचे अध्यक्ष श्री.समीर ठाकूर यांनी आभार व्यक्त केलं.












