मसुरे गावठणवाडी येथे 20 रोजी धार्मिक कार्यक्रम!

 मसुरे | झुंजार पेडणेकर
मसुरे गावठणवाडी येथील श्री समर्थ अवधुत महाराज यांच्या समाधी मंदीराचा
कलशारोहण चतुर्थ वर्धापनदिन सोहळा
२० मे रोजी
आयोजित केला आहे.
सकाळी ९.०० ते ११.०० वा. धार्मिक विधी,दुपारी १२.०० वा. महाआरती, दुपारी १.०० ते ३.०० वा. महाप्रसाद, सायं. ७.०० ते ९.०० वा. भजन,
रात्रौ ९ .३० वा. वालावलकर दशावतार कंपनीचा महान पौराणिक नाट्यप्रयोग
आदी कार्यक्रम होणार आहेत. ज्या भाविकांना अन्नदान करावयाचे असल्यास संपर्क श्री. महेश राजाराम बागवेः ९४२०२०६९५१ श्री. समिर सावंतः ८९२८६९६०८३ संपर्क साधावा. उपस्थितीचे आवाहन समस्त मसुरे देऊळवाडा ग्रामस्थ, गावठणवाडी व अवधुत महाराज भक्तजन यानी केले आहे.